![]() |
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त 14 नोव्हेंबर बाल दिवस संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आज शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील बाल चिमुकल्याने बाल दिनानिमित्त विविध प्रकारचे खेळ, भाषण त्याचबरोबर वेगवेगळे आनंदी क्षण साजरे केले. बाल दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करून त्या स्पर्धेमधून गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संस्थेच्या वतीने बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा ,विविध सामूहिक खेळ घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी सहशिक्षक प्रकल्प संचालिका वर्षा मोरे, शितल मस्के ,लीना बागल ,शितल बागल, सीमा रकटे, फर्जना पटेल, सुनिता राठोड, प्राचार्य तनुजा यादव , उपप्राचार्य नियाज मुलाणी, प्रवीण यादव ,तेजश्री गव्हाणे, सोनाली मागाडे ,अजय सावंत ,नवनाथ खांडेकर, वैभव माने, अजय मोरे ,मोनाली गायकवाड, सुनिता सुळे , शाईन शेख, सायली सोनवणे, दादासाहेब मोरे, नवनाथ शिंदे आदी शिक्षक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स देऊन सर्व शिक्षकांनी बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


0 Comments