गादेगांव - टिम कृषीदीप न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांचा शेंडगे परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला .सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रणव संतोष शेंडगे याची रशिया येथे एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल त्याचबरोबर शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला नावलौकिक मिळवल्याबद्दल गादेगाव ग्रामस्थ व शेंडगे परिवार यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वस्तीवरील सर्व ग्रामस्थ व वडीलधारी मंडळी उपस्थित होते .यावेळी गणपत मोरे यांनी भविष्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याविषयी आश्वासन दिले. शिवरत्न पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणारा प्रणव शेंडगे याने नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्यामुळे नुकतीच रशिया येथे एमबीबीएस साठी त्याची निवड झाली असल्याचे सांगितले , क्रीडा क्षेत्रामध्ये व मेडिकल क्षेत्रामध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेज मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी देण्याचा संकल्प केला असल्याचा गणपत मोरे यांनी सांगितले.या सत्कार समारंभासाठी नामदेव शेंडगे ,तुकाराम शेंडगे ,अनिल शेंडगे, सिताराम शेंडगे ,संतोष शेंडगे ,बापूराव शेंडगे ,सुशील बागल ,बंडू बागल, गणेश शेंडगे ,जयदीप सावंत, भगवान महाराज बागल, राजू बागल ,आतुल फाटे,अमोल बागल, दादासो पवार, कुबेर सावंत, बिभीषण भींगारे, ज्ञानेश्वर बागल, काशिनाथ सावंत, आप्पासाहेब बागल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments