संभाजी ब्रिगेडतर्फे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
पंढरपूर (प्रतिनिधी):
संभाजी ब्रिगेड पंढरपूर तर्फे आज तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात तालुक्यातील अनेक ठिकाणी भेसळयुक्त रासायनिक खतांचा बेकायदेशीर व्यापार सुरू असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची माहिती देण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शेखर आटकळे यांनी अधिकाऱ्यांकडे अशी मागणी केली की, संबंधित विक्रेत्यांची तपासणी करून दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणात अधिकाऱ्यांची साखळी जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
“शेतकऱ्यांना दर्जेदार खत मिळाले पाहिजे. भेसळयुक्त खत विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर येवू पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष तपासणी झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बागल उपाध्यक्ष प्रकाश गाजरे सचिव स्वप्नील गायकवाड संघटक दादा बोडके उपस्थित होते

0 Comments