गादेगांव - ( टिम कृषीदीप न्यूज )
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलबजावणी करण्यात आलेल्या भारतीय संविधानास आज 75 वर्षे पूर्ण झाले असून यानिमित्त शिवरत्न पब्लिक स्कूल येथे संविधान पुस्तकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना विविध कलमांची माहिती करून दिली.
भारतीय लोकशाहीमध्ये संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले लोकशाहीला बळकटीकरण करण्यासाठी व सर्वसामान्यांना न्याय व हक्क देण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले असल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आम्ही भारताचे लोक भारताचे समाजवादी व धर्मनिरपेक्ष गणराज्य याविषयी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संविधान पर मनोगत व्यक्त करून आपले विचार मांडले .
यावेळी प्रकल्प संचालिका वर्षा मोरे ,सहशिक्षक प्राचार्य तनुजा यादव उपप्राचार्य मुलाणी, सहशिक्षक शितल मस्के,लीना बागल,शीतल बागल,फर्जना पटेल, सुनिता राठोड,सिमा रकटे, वैभव माने ,प्रवीण यादव, अजय सावंत, दीपक देशमुख, दादासाहेब मोरे ,तेजश्री गव्हाणे, सोनाली मागाडे, मोनाली गायकवाड, सायली सोनवले ,विद्या सुळे, अविता कांबळे ,अजय मोरे, महापा खांडेकर, आदी शिक्षक उपस्थित होते.



0 Comments