गादेगांव - टिम कृषीदीप न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य दाखवताना दिसत आहेत नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला आहे त्यापैकीच प्रणव संतोष शेंडगे याने नीट परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून रशिया येथील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित केला आहे याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांच्या वतीने त्याचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतामधील बरेच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रगत देशमानला जाणाऱ्या रशियामध्ये जात असतात यानंतर पुढील पाच वर्षे एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रणव शेंडगे रशियासाठी रवाना झाला आहे. यावेळी सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर गादेगाव ग्रामस्थांच्यावतीने व सहशिक्षक नियाज मुलाणी, तनुजा यादव ,अजय मोरे ,वर्षा मोरे ,लीना बागल, तेजश्री गव्हाणे ,सोनाली मागाडे ,मोनाली गायकवाड ,अजय सावंत नवनाथ खांडेकर, वैभव माने ,अविता कांबळे ,शितल बागल, सुनिता राठोड, फर्जना पटेल ,शितल मस्के, प्रवीण यादव, दादासाहेब मोरे,आदी शिक्षकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

0 Comments