पंढरपूर - (टिम कृषीदीप न्यूज)
उमा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 'युथ फॉर माय भारत व डिजिटल साक्षरतेसाठी युवक'हे ब्रीद वाक्य घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व उमा महाविद्यालय पंढरपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ जानेवारी २०२५ ते ०३ फेब्रुवारी २०२५या कालावधीत संपन्न होणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे गादेगाव येथे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त युवा नेते प्रणवजी परिचारक, गादेगाव सरपंच सीमाताई बालाजी बागल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते प्रणव परिचारक यांनी " राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून व लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या ग्रामस्वच्छतेमुळे स्वच्छतेचे महत्व समजून ग्रामीण व शहरी भाग स्वच्छ होऊन 'स्वच्छ भारत सुंदर भारत' निर्माण होणार आहे. याबरोबरच रा.से.यो. स्वयंसेवक विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती बांधलकी निर्माण होते. असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी रा.से. यो.स्वयंसेवक विद्यार्थ्यांना या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून. भरीव कामे केली जातात. यामुळे स्वयंसेवक विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व कळते. स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. यामध्ये समाजाचा मोठा वाटा असतो. म्हणूनच ग्रामस्थांचाही सहभाग असावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी शिंदे,आनिल बागल यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.सिंधू खिलारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कावरे व्ही एन यांनी केले. उपस्थितांचे आभार कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. लोखंडे एन एस यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, रा.से.यो.स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

0 Comments