Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

माघ यात्रेनिमित्त पंढरपुरातील वाहतूक मार्गात बदल

 

                 सोलापूर/पंढरपूर,दि.30 (जिमाका) :  माघ शुध्द एकादशी शनिवार  दि. 08 फेब्रुवारी 2025 रोजी असून,  माघ यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात्रा कालावधीत पंढरपूर शहरातील तसेच शहरा बाहेरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल 02 ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीपर्यंत राहणार आहे.  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांना सूचना:- पंढरपूरात यात्रे निमित्त अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने अहिल्यादेवी चौक, शेटफळ चौक मार्गे  मोहोळ रोड विसावा येथे पार्क करावीत. 65 एकर येथे फक्त दिंडी व पालखीचे वाहने पार्क करावीत. पुणे,सातारा,वाखरी,मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने टाकळी बायपासमार्गे वेअर हाऊस व यमाई तुकाई मंदीर येथे पार्क करावीत. 

पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना:- पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबादकडे जाणारी सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, कौठाळी बायपास , नवीन सोलापूर नाका मार्गे जातील. पुणे-साताऱ्याकडे जाणारी वाहने  सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस चौक, वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका येथून  टाकळी बायपास व गादेगाव फाटा मार्गे जातील.

पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहतुकीबाबत:- 06 ते 9 फेब्रुवारी  2025 पर्यंत प्रदक्षिणा मार्ग ,महाव्दार चौक ते शिवाजी चौक,सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी तीन रस्तामार्गे येणारी हलकी वाहने फक्त अंबाबाई पटांगणात उतरतील. नियमित ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल, नवीन पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक , लहुजी वस्ताद चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे. अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, शिवाजी चौक ते अर्बन बँक, संकुल कार्नर ते  नगरपालिका  मार्ग हा मार्ग पासेसच्या वाहना व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.

पार्किंग व्यवस्था सूचना :-  अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर, मोहोळकडून येणारी वाहने आहिल्या चौक, तीन रस्ता मार्गे मोहोळ रोड विसावा व नगरपालिकेच्या वाहनतळावर पार्किग करतील. तसेच 65 एकर येथे दिंडी व पालखीची वाहने पार्कींग करतील. पुणे, सातारा, वाखरी, मार्गे येणारी वाहने इसबावी विसावा येथे पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी  मार्गे येवून वेअर हाऊस येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस येथे पार्कींग करावीत. यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण, गजानन महाराज मठ, नगरपालिका पार्कींग, क्रीडा संकुल तसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.

एकेरी मार्ग:- कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील. 

संबधित भाविकांनी व वाहनधारकांनी या बदलेल्या वाहतूक मार्गाची नोंद घेऊन वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी  यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement