Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

अ. भा. नामदेव क्षत्रिय महासंघाचे घुमान (पंजाब) येथे दोन दिवशीय महाअधिवेशन

 

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

 - अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली व भक्ती संप्रदाय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ व ३ मार्च २०२४ घुमान (पंजाब) येते दोन दिवसाचं महा अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन ह.भ.प. रामकृष्ण बगाडे (महाराज) व अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीचे  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर यांनी सर्व समाज बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलेला आहे.

दक्षिणेत रामेश्वरपासून उत्तरेकडील हिमाचल प्रदेशापर्यंत अखंड भारतभर सामाजिक समतेचा व ऐक्याचा विचार प्रत्यक्षात रुजवणारे संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात की, " नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू " हाच संकल्प आयुष्यभर जपून जातिभेदाला फाट्यावर मारत भक्तिमार्ग सर्वाना खुला असतो हे जाणणारे व स्वत: या मार्गाचा प्रसार करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांचे काम, किर्तन आणि समाजप्रबोधन हे महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते असे नाही. तर पंजाबमध्येही संत शिरोमणी नामदेव महाराजांचे नाव आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवीपैकी ते एक असलेल्या संताचे महाराष्ट्र, पंजाबसोबतच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत संत शिरोमणी नामदेव महाराजांची मंदिरे आहेत. 

पंजाब मधिल  घुमानमध्ये असलेलं त्यांचे स्मृतिमंदिर त्या घुमान गावात संत नामदेव बाबा यांची समाधी आणि नामदेवजी का गुरुद्वारा… म्हणजे नामदेवांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेला गुरुद्वारा अशी एकत्र स्वरूपाची आहे. अशा पवित्र ठिकाणी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली महा अधिवेशन आहे.तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे. अशी माहीती प्रदेश प्रसिद्ध प्रमुख संतोष मुळे यांनी दिली . 


    

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement