Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सहकार शिरोमणीच्या सभासदांना दिपावलीनिमित्त्‍ साखर वाटप सुरु

 


पंढरपूर येथील साखर विक्री केंद्राचा शुभारंभ..,

पढरपूर ( टिम कृषीदीप न्यूज ) 

 सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिपावली सणासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या साखर विक्री केंद्राचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व संचालक मंडळयांच्या ठरलेल्या धोरणानुसार ऊस उत्पादक सभासद,बिगर सभासद शेतकरी यांना प्रत्येकी 50 किलो साखरेचे वाटप पंढरपूर येथील कार्यालया समोरील मठामध्ये साखर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर यांचे शुभहस्ते सदर साखर विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक,जयसिंह देशमुख, अरुण नलवडे, संतोषकुमार भोसले, ॲड.तानाजी सरदार,आण्णा शिंदे,  माजी संचालक राजसिंह माने, मा.पंचायत समिती सदस्य्‍ सुरेश देठे, सभासद विलास पाटील, रावसाहेब पवार, संतोष कोकाटे, गजानन निर्मळ, औदुंबर चव्हाण, संभाजी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर साखर विक्री सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असून,सदर साखर विक्री दि.15 डिसेंबर पर्यत सुरु ठेवण्यात येणार आहे.साखरेचे कुपन चिटबॉय मार्फत सर्व सभासदांना घरपोच करण्यात येणारआहे.सर्व कुपनधारकांनी साखर कुपनासह स्वत:चे आधारकार्ड किंवा ओळखपत्र दाखवून साखर घेण्यात यावी असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत नाना कोळेकर यांनी केले व सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement