पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )
पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील सुग्रीव बलभिम कोळी यांची राष्ट्रवादी पदवीधर सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातून पदवीधर सेलच्या प्रदेश कार्यकारिणीवर त्यांची एकमेव निवड झाली आहे.
सुग्रीव कोळी यांनी यापूर्वी राष्ट्रवादी पदवीधर सेलच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. शिवाय ते विद्यार्थी दशेपासून राष्ट्रवादी पक्षाशी निगडित असून पदवीधर आ. अरुण लाड यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका बजावीली होती. त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व डॉ नरेंद्र काळे यांनी त्यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या निवडी नंतर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, आ. बबनदादा शिंदे, आ. संजयमामा शिंदे, आ. यशवंत माने, दीपक साळुंखे, उत्तम जानकर, भगीरथ भालके, कल्याणरावं काळे, अभिजित पाटील, गणेश पाटील, श्रीकांत शिंदे, आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments