Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

काँग्रेस माथाडी कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक पाटोळे

 


पंढरपूर --- ( टिम कृषीदीप न्यूज )

काँग्रेसच्या माथाडी कामगार सेलच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील अशोक रामचंद्र पाटोळे  यांची निवड करण्यात आली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या शिफारशीनुसार पाटोळे   यांची निवड करण्यात आली असून त्यांना मुंबई येथील टिळक भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी  माजी आमदार उल्हास पवार, प्रदेशाध्यक्ष छगण पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष अहमद चाऊस, राजन भोसले, रफीक इनामदार, उस्मान चाऊस, सुधीर पराटे यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले.

 अशोक पाटोळे  यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. तर या उपक्रमातून समाजातील तळागाळातील  जनतेसाठी आधारभुत कार्य केले आहे.  पाटोळे  यांच्या या कार्याची दखल घेवून माथाडी कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पाटोळे  यांची निवड झाल्याने त्यांचे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व पंढरपूर तालुक्यातील नेते मंडळींकडून  अभिनंदन केले जात आहे.

कामगार कल्याणासह पक्ष बळकटीचे  ध्येय....

आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील , दादासाहेब साठे, युवकचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारी पदाधिकार्यांना सोबत घेवून पक्ष संघटन अधिक बळकट  करण्यासाठी सदैव कटीबध्द राहणार आहोत. तसेच कामगारांच्या विविध समस्यांना वाचा फोडणे व त्यांच्यासाठी उपक्रम राबवून त्यांच्या विकासाचा सातत्याने प्रयत्न करणार आहे.

अशोक पाटोळे 

जिल्हाध्यक्ष , काँग्रेस माथाडी कामगार सेल, सोलापूर

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement