पंढरपूर-( टिम कृषीदीप न्यूज)
भंडीशेगांव ता.पंढरपूर येथे ग्रामपंचायत च्या मालकीच्या बेचाळीस एकर पडीक जमिनीवर सामाजिक वनीकरण व ग्रामस्थांनी मागील तीन वर्षांपूर्वी साडेसतरा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती, या वनीकरण ची पाहणी मुबई येथील उद्योजक वृक्षमित्र अजित कंडरे यांनी केली,यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक मुरलीधर येलमार हे उपस्थित होते.
वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, बदलत्या हवामानात आपण पर्यावरण चा समतोल राखण्यासाठी आणि वन्य जीव वाचवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे वृक्षारोपण ची चळवळ उभारली पाहिजे असे मत वृक्षमित्र अजित कंडरे यांनी यावेळी व्यक्त केले.
भंडीशेगांव येथे अजित कंडरे यांनी मागील पाच वर्षांपासून वृक्ष लागवड चळवळ सुरू केली आहे, याच चळवळीची सुरुवात म्हणून अजित कंडरे यांनी गावातील पडीक जमिनीवर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या या उपक्रमाला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व तत्कालीन गट विकास अधिकारी रविकिरण घोडके,सामाजिक वनीकरण च्या जिल्हा प्रमुख सुवर्णा माने,आहेर साहेव व ग्रामपंचायत ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन या पडीक जमिनीवरील काटेरी झुडपे काढून साडेसतरा हजार वृक्ष लागवड केली असल्याची माहिती डॉ.श्रीधर येलमार यांनी दिली.
अजित कंडरे यांनी गावात वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याची प्रथा सुरू केली, याच चळवळीत अजित कंडरे यांनी गावात लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुद्ध पार्कची निर्मिती केली,पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार, डॉ अनिल येलमार व प्रशांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते.पुणे येथील राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मशिदीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते.तत्कालीन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपसरपंच संतोष ननवरे यांनी वृक्षारोपण केले होते, आश्या विविध व्यक्तींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावभर वृक्षारोपण केले होते, आज संपूर्ण गावात वृक्षांची मोठया प्रमाणावर लागवड झालेली असून सर्व वृक्ष सुस्थितीत असल्याची माहिती अशोक येलमार व सतीश रणखांबे यांनी दिली.
या पाहणीच्या वेळी ज्ञानेश्वर गिड्डे,आनंदा येलमार,सुनील आंपळकर,गणेश रत्नपारखी, डॉ.हेडगेवार वाचनालयाचे मारुती गिड्डे,संतोष भोसले,बाळासाहेब येड्रॉवकर आदी उपस्थित होते.

0 Comments