आ निकम यांनी नागेश फाटे यांच्या पक्ष संघटन कार्या चे केले कौतुक
पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा. श्री .शेखर भाऊ निकम साहेब आज सोलापूर तुळजापूर पंढरपूर दौऱ्यावर आले असता पंढरपूर येथील नागेश दादा फाटे यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली पक्ष संघटन बांधणीसाठी केलेला उद्योग व व्यापार विभाग महाराष्ट्र दौरा करून राज्यभरात युवक युवतींचे राज्यात पक्ष संघटनेचे उभं केलेले मजबूत जाळे त्याबाबतीत विस्तृत असं मार्गदर्शन केले फाटे यांच्या करत असलेल्या कामाचे कौतुक करून संघटनावाढी विषयी चर्चा केली प्रदेश पातळीवरती काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या महत्त्व पटवून देत त्यांना कशा पद्धतीने जपावं जेणेकरून पक्ष संघटनाही राजकीय संघटना नसून तो आपलं कुटुंब आहे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना झाली पाहिजे हीच खरी पक्ष संघटनेची ताकद असून त्यांच्या जीवावरती पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करता येऊ शकते आणि तेच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केल्याचे निकम साहेबांना सांगितले . अशा या अल्पपैलू व्यक्तिमत्त्वाच्या तासभराच्या चर्चेत कार्यकर्त्यांचा नाही तर पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी गुणधर्म अंगीकरण्यासारखे आहेत. पक्षाने दिलेल्या कोणत्याही जबाबदारीला प्रामाणिकपणे न्याय देत दिलेल्या संधीचे सोनं करणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला त्या करत असलेल्या कार्याला भविष्यात अशीच झळाळी मिळत जावी या सदिच्छासह आपल्याला अमूल्य वेळ आमच्यासाठी राखीव ठेवून आम्हाला सखोल आशा प्रकारचा योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल फाटे विद्यमान आमदार मा. श्री .शेखरभाऊ निकम साहेबांचे मन: पूर्वक आभार. मानले या काळात आपल्या अनुभवाचा फायदा संघटना वाढीसाठी निश्चित होणार असून ज्या पद्धतीने आपण संकट काळात संघटनेची नव्या पद्धतीने उत्तम बांधणी केली त्याच पद्धतीने काम करून महाराष्ट्रभर संघटना मजबूत करणार असल्याचे आश्वासन निकम साहेबांना याप्रसंगी दिले .
यावेळी आ. निकम यांचा फाटे यांच्या कडून यथोचित सत्कार करण्यात आला
याप्रसंगी चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सौ.प्रिया निकम , साहेबांचे जावई उद्योजक मा श्री अभिजीत सुर्वे व उद्योजिका सौ सई सुर्वे.श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट निधी बँक संचालक गोरख नाना बागल , संजय पवार, रमेश फाटे , सतिश बागल , उमेश फाटे, औंदुबर माने उपस्थित होते .


0 Comments