![]() |
पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )
सध्याची परिस्थिती पाहता सरकारी शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यातच सरकारी शाळांची कमतरता आहे. अपवादात्मक काही सरकारी शाळा सोडल्या तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. परंतु खाजगी शाळांमध्ये अत्यंत मनमानी कारभार चालतो. शाळांतील मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी गजानन भगत यांनी केली आहे.
त्यांच्या दिलेल्या ठराविक शॉप मधुन प्रत्येक वर्षी नवीन गणेश घ्यावा लागतो. आणि त्यातच शाळेच्या मनमानी कारभार नुसार डोनेशनच्या नावाखाली, परीक्षा फी, ऍडमिशन फी म्हणून अव्याहव्य फी आकारली जाते. हे थांबविण्यासाठी शासनाने पालकांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय गांभीर्याने विचार करावा. खाजगी शाळांची फी कमीत कमी वार्षिक असावी असे निवेदनातून केली आहे.
वार्षिक फी कमीत कमी करावी. एकदा एडमिशन घेतल्यावर प्रत्येक वर्षी वाढीव फी घेणे बंद करावे, प्रत्येक पाच वर्षांनी गणवेश बदली करण्याची नियमावली करावी. शाळेची पुस्तके कोणत्याही शॉप मधुन घेण्याची पालकांना परवानगी द्यावी. फी भरली नाही म्हणून परीक्षेस बसू न देणाऱ्या शाळेवर कार्यवाही करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे
श्री जि एम भगत
राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख
पोलीस मित्र संघटनेच्या वतीने केली आहे

0 Comments