सातारा- ( टिम कृषीदीप न्यूज )
मापोसे व भापोसे पोलीस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात असे कोणते कार्यालय आहे. जी महाराष्ट्र जनतेसाठी त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी २४ तास३६५ दिवस उघडे असते, असे कोणते कर्मचारी अधिकारी आहेत जे सणासुदीलाही रस्त्यावर बंदोबस्त, मोर्चा, मंत्र्यांची सिक्युरिटी, सामान्य जनतेचे प्रॉब्लेम सांभाळायला उभे असतात. स्वतःच्या घरच्या लोकांपेक्षा जनतेच्या रक्षणाची काळजी घेणारे कोणते लोक आहेत जी २४ तास ३६५ दिवस समाजाच्या रक्षणासाठी उभे असतात. कोरोना काळात लॉयन ऑर्डर सांभाळण्यासाठी कोण रस्त्यावर जीवाची बाजी लावून उभा होता विचार करा...हा कोण आहे जो स्वतःसाठी आंदोलन करू शकत नाही स्वतःवरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडू शकत नाही मोर्चे काढू शकत नाही.. तरी देखील जनतेच्या जानी मालाची रक्षा करणारा, समाजामध्ये कुठलीही अनुचित घटना होऊ नये, सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून चिंता करणारा एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस.घरी सण असो कार्यप्रसंग असो शारीरिक व्याधी असो बीमार असो काहीही संकट ओढवले तरीही नोकरीसाठी सज असणारा एकमेव व्यक्ती म्हणजे *महाराष्ट्र पोलीस प्रत्येक शहरात भरती होणारा अंमलदार कर्मचारी वर्ग एका शहरात पाच ते सहा वर्ष फक्त पोलीस स्टेशनची जागा चेंज
पोलीस महाराष्ट्र
होते पण शक्यतो शहर तेच राहते पण अधिकारी वर्गाची नेहमीच तारांबळ उडते तीन वर्ष पाच वर्ष असा काळ घालवला की परत त्यांची पदोन्नती बदली यांचे वारे वाहले की त्यांना आहे त्या परिस्थितीत त्या जागेवर रुजू व्हावे लागते अशावेळी त्यांच्या परिवाराचे किती हाल होत असतील त्यातही बाहेर गाव राहणाऱ्या पाचशे हजार किलोमीटरच्या अंतरावरील महिला अधिकाऱ्यांचे हाल जास्तच असतात पण तरीही नोकरी इमानदारीने करण्याचा प्रयत्न करतात, समाजाचे सुखदुःख हेच त्यांचे भांडवल असतं इथे ज्यांचे लागेबांधे आहे त्यांचे तर काम कशाप्रकारे ही होऊन जाते पण इमानदार अधिकान्यांना भरपूर मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो पोलीस खात्याचे महासंचालक व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनाही कधी यांच्या व्यथा कळत नाही, पोलीस खात्याचे उच्च वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्री असूनही पालक मायबाप असूनही यांना पोरके असल्यासारखे नेहमी वाटत असते कारण यांच्या मनातील खदखद व यांच्या मनातील व्यथा ही कोणीच आत्मीयतेने व आपुलकीने ऐकून घ्यायला तयार नाही प्रत्येक वरिष्ठ अधिकारी समजून घेईल असे जरुरी नाही म्हणून अधिकारीअसूनही घावरून त्यांना काहीतरीसांगावे की नाही सांगावे हाही फार मोठा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर पडतो. कारण हे एकमेव असे विभाग आहे जिथे बक्षीस नंतर मिळते पण शिक्षा पहिले दिल्या जाते आणि यामुळे फक्त फरफट होते त्रास होतो म्हणून जनरली कोणी या विषयावर समोर जायला तयार होत नाही. मग शारीरिक त्रास असो मांत्रिक मानसिक त्रास असो आर्थिक व्याधी असो काही असो फक्त शरीरात प्राण असेपर्यंत नोकरी करणे हाच एकमेव पर्याय सर्वांसमोर आहे. समाजाचे रक्षण करता करता त्यांच्या त्रासाचे किस्से ऐकता ऐकता त्यांना समाधान देता देता पोलिसांचे संपूर्ण जीवन वाहून जाते. त्यातही सर्वसामान्य लोकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा, पण जात धर्म भाषा पंथ प्रांत याही पलीकडे काम करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे पोलीस कोणी किती काही नावे ठेवली दोष दिला सन्मान केला, धन्यवाद म्हटले किंवा नाही म्हटले तरी ती सेवा परिपूर्णपणे देणार तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस हा खाकीचा सन्मान सर्वांनाच मिळत नाही त्यासाठी नशीब असावा लागतो. खाकी घालून सेवा करणे हे प्रत्येकाच्या वसचं काम नाही, वरच्यांनी त्याची नियुक्ती या कामासाठी केली असावी असे म्हणायला हरकत नाही. कारण सर्वसामान्य व्यक्ती आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या परिवारासाठी लढतो पण पोलीस वर्ग हा सर्वसामान्यांच्या हितासाठी लढतो हा एक फरक
करत असलेल्या सेवेचा आम्हाला गर्व आहे अभिमान आहे की महाराष्ट्र पोलीस सज्ज आहे महाराष्ट्र आणि भारतीय पोलीस सेवेसाठी माझे वैयक्तिक मत आहे. जनहितार्थ प्रसारित करत आहे 7709214202/ 8010048965*
--------------------------------------------------------------------
तरी प्रत्येक सरकारकडून पोलिसांना त्यांच्या हक्क व अधिकारापासून डावललं जातं त्यांना त्यांचे हक्क व अधिकार सहजासहजी मिळत नाही ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका व गंभीर बाब आहे.तरी कुठला आकांत ओरड न करता शांतपणे संयमपणे आपली नोकरी करून सेवा देणाऱ्या सर्व महाराष्ट्र पोलिसांना अशा त- मन-धन सेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी मानाचा सलाम गर्व आहे महाराष्ट्र पोलिसांवर तुमच्यासारखे कार्य या जगात कोणीही करू शकत नाही कोणाची कोणाचीही लायकी नाही. महाराष्ट्र पोलीस हे जनतेचे खरे मायबाप आहे कारण ते प्रत्येक जनतेची आपल्या लेकराप्रमाणे काळजी घेत असतात त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या समस्या ऐकण्यास पोलीस स्टेशन नावाच्या घरट्यामध्ये बसल अस * २४ तास ३६५ दिवस संकटकाळी धावून जाणारा एकमेव महाराष्ट्र पो भारतीय पोलीस प्रशासन सेवा आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपले उपकार व आपली सेवा आम्ही कधी विसरू शकणार नाही.
मा श्री जि एम भगत
राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत
--------------------------------------------------------------------------

0 Comments