महाराष्ट्र राज्य साखर कारखाना ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर ट्रक मालक यांची ऊस तोडणी मुकादम यांच्याकडून झालेली आर्थिक फसवणुकीबाबत ऊसतोड टोळी मुकादम विरोधात दिनांक:- 26/04/2023 रोजी आंदोलनाचे पत्र आझाद मैदान पोलीस ठाणे येथे देण्यात येणार असत्याचे पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र जनसंपर्क प्रमुख गजानन भगत यांनी सांगितले
आंदोलनाचे पत्र देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील आर्थिक फसवणूक झालेले ऊस वाहतूकदार यांनी वरील दिलेल्या तारखेस मुंबई आझाद मैदान येथे उपस्थित राहण्याचे अवाहनही संघटनेद्वारे करण्यात आले आहे
सदरील निवेदन पत्रात त्यांनी नमुद केले आहे महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना ऊस वाहतूकदार ट्रक ट्रॅक्टर मालक यांची ऊसतोड टोळी मुकादम यांचे कडून झालेली आर्थिक फसवणूक याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री.
महाराष्ट्र पोलीस महासंचालक मा श्री रजनीश सेठ साहेब. विरोधी पक्ष नेते मा श्री अजितदादा पवार साहेब. साखर संकुल आयुक्त गायकवाड साहेब. मुख्यमंत्री सचिवालय. खासदार आणि आमदार साहेब यांना ऊस वाहतूकदार यांना न्याय मिळावा यासाठी विनंती पत्र देण्यात आले.
तरी महाराष्ट्र राज्यातील ऊस वाहतूकदार यांच्या आर्थिक फसवणूक झाली या संदर्भात त्यांना न्याय मिळाला नाही यासाठी आम्ही
आमच्या तर्फे अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात आले. परंतु शासन, प्रशासना तर्फे काही ही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
म्हणून ऊस वाहतूकदार यांच्या ऊसतोड मुकादम यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाली याबद्दल मुकादम यांच्या विरोधात आझाद मैदानात आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. त्या करीता आपली परवानगी आणि सहकार्य महत्वाचे आहे.
तरी जनहिताच्या आमच्या या आंदोलनास परवानगी देवून योग्य तो सहकार्य करण्याची कृपा करावी .
अशा आशयाचे अंदोलनाच्या परवानगी चे पत्र मा वरिष्ठ पोलीस निरिक्षक आझाद मैदान पोलीस ठाणे आझाद मैदानासमोर महापालिका मार्ग फोर्ट मुंबई यांना देण्यात येणार आहे यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख जी एम भगत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ सुनिल भाऊ पाटील राष्ट्रीय सचिव व युपी प्रभारी अवधेश शुक्लाजी राष्ट्रीय सदस्य व हरियाना प्रभारी राजकुमार चंदन सचिव महाराष्ट्र प्रदेश राजू कामतकर अध्यक ज्वेलर्स विभाग निलेश चोरडिया राष्ट्रीय सदस्य दतात्रय पवार यांच्या उपस्थित अंदोलन करण्यात येणार आहे
महाराष्ट्र राज्यातील ऊस वाहतूकदारांना यांना काही सुचवायचे असल्यास खालील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधण्याचे अवाहनही करण्यात आले आहे
7709214202 /8010048965


0 Comments