आदिमानवाच्या काळात शास्त्रीय भाषेतील रंगरेषा व चित्रछटा या यापासून निर्माण झालेली भाषा भाष्य व भावनेतून निर्माण होणारी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा असून जगात किती भाषा बोलतात ती न समजणारे अनेक प्रांतात लोक आपला रहिवास जगत असतात पण जगाच्या कानाकोपऱ्यातील चित्रकाराने काढलेल्या चित्रांच्या रंगरूप रेषानी जगाला समजणारी भाषा ही चित्ररुपात आढळते म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ भाषा ही चित्रकाराच्या चित्रातील रेषा रंगरूप करून त्यातील भावनांच्या रूपाने जगाला समजतेच म्हणूनच चित्ररूप भाषा ही जगात सर्व श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन बिग बॉस फेम अभिनेते किरण माने यांनी केले. सातारा जिल्ह्यातील चित्रकार पेंटर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.....जागतिकीकरणाच्या धामधुमीत अनेक देशात अनेक संस्कृतीने नटलेल्या या दुनियेत विविध भाषांचे ज्या त्या ठिकाणी प्रभुत्व असून जगातील कोणत्याही चित्रकारांची चित्र पाहिल्यास त्यांची भाषा व भावनेतून व्यक्त होणारे रूप व भावना होते अशा कलावंतांच्याच्या कुंचल्यातून साकारलेले भाषा ही जागतिक भाषा व त्या कलाकृतीच्या भावनिकता या मधुर सर्वांगसुंदर भाषेची निर्मिती होत असून त्यामुळे जागतिक भाषा ही चित्रांना बोलकी करणारी असल्याचे प्रतिपादन किरण माने यांनी केले. सातारा जिल्ह्य़ातील प्रमुख चित्रकारांनी नव्यानेच स्थापन केलेल्या या रांगोळी प्रदर्शनास उस्फूर्तपणे सातारा जिल्हावासी लोकानी प्रतिसाद देवून कलेला दाद दिल्याचे सांगून रंगरुपात असणार्या चित्रकलेच्या माध्यमातुन आयुष्याचे रंग शोधून त्यातून माणूस घडल्याचे नमूद करून रांगोळी म्हणजे पृथ्वीच्या पटलावरील दागिना असल्याचे जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी सांगून टिपक्याच्या रांगोळी पासून ते महारांगोळीपर्यंत जागतिक रांगोळीकार तयार झाल्याचा अभिमान असल्याने सासवडच्या रांगोळीकार सोमनाथ भोंगळे यांच्या जागतिक दर्जावर केलेल्या कामगिरीवर संस्थेच्या वतीने खास सन्मानित करण्यात आले..यावेळी सत्काराला उत्तर देताना भोंगळे म्हणाले की कलावंत हा जातीधर्माच्या दुनियेत न रमता तो रंगाच्या दुनियेत हरवून आपली कला जगासमोर निरपेक्ष भावनेने सादर करतो............... सातारा शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रविण माने, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, चित्रकार शौकतअली शेख यांचे मार्गदर्शन लाभले.. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसगडे,दत्ता पिसाळ पेंटर संस्थेचे अध्यक्ष पंकज कणसे, जया पवार गणेश जाधव, अभिजित जाधव केशव जगताप, मुरारी,दिगंबर जाधव व सोमनाथ आवळे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन धनराज जगताप यांनी केले तर मोहन जगताप यांनी आभार मानले

0 Comments