Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भंडीशेगांव येथे विविध विकास कामाचे उदघाटन

 


       पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )

गावांनी निवडणुकीत राजकारण करावे पण निवडणुकीनंतर मात्र सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत युवक नेते प्रणव परिचारक यांनी भंडीशेगांव ता.पंढरपूर येथील विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी कोळवले उपस्थित होते.

पंचायत समिती सदस्य पल्लवी येलमार यांच्या फंडा मधून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामाचे शुभारंभ प्रसंगी पल्लवी येलमार यांच्या सदस्य कार्यकीर्दी मधील पाच वर्षांचा  कालावधी मधील कामाची माहिती डॉ.अनिल कंडरे यांनी यावेळी दिली.सूत्रसंचालन डॉ.श्रीधर येलमार यांनी केले तर आभार मंगेश ननवरे यांनी मानले.

भंडीशेगांव येथे नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येत असतात,गावात मागील पाच वर्षांपासून प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण सारखे उपक्रम राबविले जातात,गावात अजितदादा कंडरे यांच्या माध्यमातून मागील पाच वर्षात हजारो झाडे लावली तसेच शालेय विध्यार्थी ना शालेय साहित्य वाटप केले ,महिलांना बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण दिलेअसून त्यांच्या कार्याचा गौरव यावेळी प्रणव परिचारक यांनी आपल्या भाषणातून केला.

कार्यक्रमास श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना चे संचालक गंगाराम विभूते,सरपंच मनीषा येलमार,अशोक येलमार,माजी सरपंच राजाभाऊ माने,मधुकर गिड्डे,उपसरपंच विजय पाटील,संतोष ननवरे,डॉ.श्रीधर येलमार,माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता ननवरे,सतीश रणखांबे,विश्वास सुरवसे,अशोक येलमार,ग्रामपंचायत सदस्य मंगेश ननवरे,अनिल जाधव,डॉ.हेडगेवार वाचनालय चे महेंद्र येलपले,संतोष भोसले,मारुती गिड्डे,ज्ञानेश्वर गिड्डे,प्रकाश येलमार ,धनाजी कवडे-पाटील,संतोष भोसले सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement