Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

एमकेसीएलकडून आयआयटी कॉम्प्युटर सेंटरला 2022 गरुड झेप पुरस्कार

          


           पंढरपूर : येथील अरबूज मेन्शन स्टेशन रोड आयआयटी कॉम्प्युटर सेंटरला सर्वोत्कृष्ट संगणक संस्था गरुडझेप 2022 म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषक महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका विना कामथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांची विभागीय मीटिंग 2022 निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे झाली. एमएस-सीआयटी, टॅली  व इतर क्लिक कॉम्पुटर या सर्व कोर्सेस मध्ये सोलापूर जिल्यात सर्वाधिक प्रवेश नोंदल्याबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका विना कामथ यांच्या हस्ते नितीन आसबे व दत्ता कळकुंबे यांना हा पुरस्कार देण्यात आला. गेल्या 22 वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील आयआयटी कॉम्पुटर ही संस्था विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचे कार्य यशस्वीरित्या करीत आहे. यापूर्वीही अनेक पुरस्कार या संस्थेला मिळालेले आहेत पाच संगणकापासून 50 कॉम्प्युटरची लॅब आयआयटी या संस्थेने उभारली आहे. या यशामागे रोहिणी मांजरे वैष्णवी पाटील प्रतीक्षा चव्हाण व इतर सर्व आयआयटी कॉम्प्युटरचे शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सर्वच स्तरातून आयआयटी कॉम्प्युटर वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार प्रदान करतेवेळी MKCL चे विभागीय सरव्यवस्थापक अतुल पतोडी, महेश पत्रीके, रोहित जेऊरकर, हारून शेख, मलिक शेख, शिवानंद पाटील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व संगणक संस्था चालक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement