Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

स्वेरीच्या निकिता भागवत यांना तायक्वांदो मध्ये रौप्य पदक

 


स्वेरीची क्रीडा क्षेत्रात भरारी

 

पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )

शैक्षणिक क्षेत्रात पंढरपूर पॅटर्न’ च्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर टाकून करिअर साठी त्यांना सक्षम बनविण्याचा ध्यास घेतलेली गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी ही शिक्षण संस्था केवळ शैक्षणिक क्षेत्रातच अग्रेसर आहे असे नव्हे तर आता क्रीडा विभागात देखील चमकदार कामगिरी केल्यामुळे स्वेरीचा झेंडा डोलाने फडकत असल्याचे स्पष्ट होते.

          नुकत्याच सांगोला (जि. सोलापूर) येथे झालेल्या तायक्वांदो स्पर्धेमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या निकिता विठ्ठल भागवत यांनी रौप्य पदक (सिल्वर मेडल) पटकावले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत सांगोला येथील विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या विद्यापीठ स्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थिनी निकिता विठ्ठल भागवत यांनी ६३ किलो ते ६७ किलो या वजन गटात दुसऱ्या क्रमांकाने विजयी होऊन रौप्य पदक पटकावले. निकिता भागवत यांना स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक प्रा.संजय मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्वेरीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांकडून नियमित योगा करून घेतला जातो. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी असलेल्या स्वतंत्र वसतिगृहात अत्याधुनिक साहित्य असलेल्या जीमची सोय आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्यास विद्यार्थ्यांना वाव मिळतो. निकिता भागवत यांनी तायक्वांदो स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल पटकविल्यामुळे त्यांचा स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.एम.एम.पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुवर्णपदक मिळवल्याबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा.एम. एम.पवारशैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवारस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयाचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी निकिता भागवत यांचे अभिनंदन केले आहे.

 


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement