Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

इसबावी येथे स्वतंत्र तलाठी कार्यालयास महसूल विभागाची मंजूरी

 


पंढरपूर ( टीम कृषी दीप न्यूज )

पंढरपूर शहरातील इसबावी येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय करण्याच्या मागणीला यश मिळाले असून इसबावी भागासाठी महसूल विभागाने  तलाठी सजा मंजूर केली आहे या अगोदर गेली अनेक वर्ष जेव्हा इसबावी ग्रामपंचायत ही पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत वर्ग करून शहरास जोडली गेली तेव्हापासून इसबावीचे तलाठी कार्यालय हे पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील तलाठी कार्यालय अंतर्गत जोडले गेले होते इसबावी हा भाग मोठा असल्याने या भागासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय करण्याची मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक बालाजी मलपे यांनी तत्कालीन पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे लेखी निवेदनव्दारे मागणी केली होती त्या मागणीस यश मिळाले असुन लवकरच याठिकाणी प्रशासन पुढील कार्यवाही करून स्वतंत्र तलाठी कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती मिळत आहे

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement