Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून *थकीत व्याज परताव्याची रक्कम त्वरीत मिळावी..,

 


चेअरमन कल्याणराव काळे यांची उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी.

पंढरपूर- (टीम कृषी दीप न्यूज )

    आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा उद्योजकांना गेले काही महिनेपासून मिळाणारे व्याज परताव्याची रक्कम खातेवर जमा न झाल्याने अडचणीत आलेल्या उद्योजकांना महामंडळाकडून त्वरीत व्याज परताव्याची  रक्कम मिळावी आशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कार्तिकी एकादशी निमित्त विठठलच्या महापुजेला पंढरपूर येथे आले असता त्यांना निशिगंधा सहकारी बँकेचे चेअरमन तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी प्रत्यक्ष भेट घेवून दिले.*

मराठा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात उभारी घ्यावी या करीता आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून मराठा युवकांना बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून प्रभावी अमंलबजावणी केल्यामुळे जिल्हयातील युवकांना याचा लाभ झालेला असून  महामंडळाने कर्जाची मर्यादाही वाढविलेली असल्याने लघु उद्योगाला चालना मिळालेली आहे.  दोन वर्षापुर्वी कोरोना सारख्या महाभयंकर संकटामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना तरुणांना फार मोठी अडचणीस सामोरे जावे लागत आहे. अशातच अशातच महामंडळाकडून व्याज परताव्याची रक्कम वेळेवर खातेवर जमा न झाल्यामुळे उद्योजकांची आर्थिककोंडी झालेली आहे. व्याज परताव्याची रक्कम नियमित केल्यास बँकेचे हप्ते भरणेस सुलभ होणार आहे. तरी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे थकीत असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधीत उद्योजकांच्या खातेवर त्वरीत जमा  व्हावी  असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement