कराड - (टीम कृषी दीप न्यूज ) भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमन पदी नुकतीच वारुंजी तालुका कराड येथील प्रकाश राजाराम पाटील यांची निवड झाल्याबद्दल आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
केसे तालुका कराड येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. यावेळी सत्ताधारी गटाने नऊ जागांवर तर विरोधी गटांनी आठ जागावरती विजय मिळवला. यानंतर आज संचालक मंडळातून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी वारुंजी तालुका कराड येथील प्रकाश राजाराम पाटील यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली त्याबद्दल पाडळी केसे तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने आज प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेशनिंग दुकानदार संघटनेची सातारा जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील, आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, कापील विकास सेवा सोसायटीचे संचालक अमोल जाधव, जयप्रकाश रसाळ (बापू ), वारुंजीचे माजी सरपंच प्रमोद पाटील (पैलवान), वारुंजी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आनंदराव पाटील (आबा ), सतीश पाटील, पराग पाटील, प्रथमेश पाटील,श्रेयस पाटील, योगेश जगताप उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रकाश पाटील म्हणाले, संचालक मंडळाने आणि सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला राहत पात्र राहून मी माझ्या चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे आणि दक्ष राहून काम करेन, स्वागत व प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले. आभार योगेश जगताप यांनी मानले

0 Comments