पंढरपूर- (टीम कृषी दीप न्यूज )
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे ग्रामस्थांसाठी मोफत सुरू करण्यात आलेल्या पिठाच्या गिरणीचे उदघाटन माजी सरपंच हरिभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यातआले. कौठाळी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नागटिळक यांनी स्वतःच्या मालकीची पिठाची चक्की भेट दिली. ग्रामस्थांसाठी मोफत पिठाची गिरणी सुरू करणारे कौठाळी हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गाव असल्याचे उपसरपंच रामदास नागटिळक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी सरपंच मोहन नागटिळक, विठ्ठल कारखान्याचे संचालक कालिदास पाटील, सोसायटीचे माझी अध्यक्ष ईश्वर धुमाळ ,सरपंच शारदा नागटिळक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन पाटील, माजी सरपंच महादेव गाढवे , ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय पाटील,धोंडीराम वाघमोडे, सोमनाथ लोखंडे, माजी सरपंच शंकर गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य रघुनाथ गोडसे, सोसायटी अध्यक्ष अरुण नागटिळक, दिलीप इंगळे, पै. संदीप पाटील,अनिल नागटिळक, नरहरी नागटिळक, सचिन आटकळे, अरुण धुमाळ, ग्रामसेवक नवले, वसंत नागटिळक अदिसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर वाघमारे, कृष्णा वाघमारे, दत्तात्रय वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

0 Comments