Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

सहकार शिरोमणी कारखान्यास महाराष्ट्र् राज्य बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांची सदिच्छा भेट..

 


पंढरपूर-( टिम कृषी दीप न्यूज)

 महाराष्ट्राची शिखर बँक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रृ राज्य्‍ सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर  सदिच्छा भेट देवुन, कारखान्यातील कामाजावर समाधान व्यक्त केले. यावेळी चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांचेहस्ते श्री.अनासकरसाहेब व पुणे मर्चंट को-आपॅरेटीव्ह् बँकेचे अध्यक्ष श्री.ढेरेसाहेब यांचा आदरातिथ्य करुन सत्कार करण्यात आला. मा.पाहुण्यांचा परिचय व स्वागत कारखान्याचे कार्यकारी संचालक झुजार आसबे यांनी केले. 

यावेळी श्री.अनासकर यांनी चालु गळीत हंगाम सन 2022-23 मधील अपेक्षित उद्दिष्ट्, डिस्टीलरी मधुन निघणारे उपपदार्थ, सहवीज निर्मिती प्रकल्पातुन तयार होणारी वीज निर्यात आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न्‍ याचा आढावा घेवुन समाधान व्यक्त केले. तसेच माझा जन्म पंढरपूरात झाल्यामुळे पंढरपूरकरांवर तसेच काळे कुंटुंबियावर माझे प्रेम असून, अनासकर कुटुंबियांचे पुर्वीपासुन काळे कुंटुंबियाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. स्व्.दादांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करुन दादांच्या आठवणीना उजाळा देवुन, सहकार शिरोमणी कारखान्यास राज्य्‍ बँकेचे सतत सहकार्य राहील व राहणार असल्याचे सांगितले. तसेच बँकेने अडचणीतील कारखान्यासाठी जी योजना तयार केली आहे त्या योजनेचा फायदा श्री.काळे यांच्या अथक प्रयत्नामुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे सहकार शिरोमणी कारखान्यास झाला असून, राज्यातील  इतर अडचणीतील कारखान्यांनाही मिळाला असल्याचे सांगितले.

सहकार शिरोमणी कारखान्यास वेळोवेळी कर्ज उपलब्ध करुन देण्यास महाराष्ट्र राज्य बँकेचा सिंहाचा वाटा असून, बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे वेळेत हप्तेही भरण्यात येत आहेत. मात्र दुष्काळ परिस्थिती आणि कोराना महामारीमुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्यामुळे सहकार शिरोमणी कारखान्याने बँकेकडे आवश्यकत्या कागदपत्रासह प्रस्ताव दाखल करुन कर्जावर सवलत मिळण्याची विनंती केली होती. सदर प्रस्ताचे अनुषंगाने बँकेने सहमती दर्शविली असून, त्यामुळे आपले कारखान्यास वेळेत हप्ते भरल्यास फारमोठा फायदा होणार असल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी यावेळी सांगितले. आणि बँकेकडून असेच सहकार्य सहकार शिरोमणी कारखान्यास सतत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थितांचे आभार कारखान्याचे संचालक बाळासाहेब कौलगे यानी मानले. यावेळी कारखान्याचे संचालक,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement