पंढरपूर- ( टीम कृषी दीप न्यूज )
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अडकलेले शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई येथील सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पंढरपूर येथील तहसील कार्यालय समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने दि.१० नोव्हेंबर रोजी फटाक्यांची आतिषबाजी व साखर वाटून जल्लोष साजरा केला.
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खा. राऊत यांच्या जामीन अर्जावर आतापर्यंत मुंबई न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. परंतू अखेर दि.९ नोव्हेंबर रोजी खा. राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्तामध्ये प्रचंड जल्लोष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले
राज्यात काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन व्यवहार प्रकरणांमध्ये शिवसेनेचे नेते खा राऊत यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) ने जूनमध्ये ताब्यात घेतले होते. बरेच दिवस चौकशी होऊन नंतर खा राऊत यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. संजय राऊत यांचा मुक्काम हा ऑर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला होता. मात्र अखेर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केल्याने पंढरपूर येथील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संजय घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, शिवसेना उपशहरप्रमुख लंकेश बुराडे, शाखा प्रमुख प्रणित पवार, रेहाना आतार, शिवसेना उप तालुकाप्रमुख उत्तम कराळे, शाखा प्रमुख बाळासाहेब पवार, उमेश काळे, हरिदास साठे, कानिफनाथ चव्हाण, नामदेव चव्हाण, सुहास नाना चव्हाण, शाखा प्रमुख संजय घोडके, स्वप्निल गावडे आदीसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments