Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तुंगत येथे कृषी विभागाचेवतीने शेतकर्यांना बीयाणे वाटप


तुंगत ( प्रतिनिधी ):
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे कृषी विभागाच्या वतीने हरभरा व ज्वारी बियाण्यांचे वाटप शेतकर्यांना करण्यात आले. ऊस पिकातुन हरभरा अंतरपीक घेण्यासंदर्भात आवाहन यावेळी करण्यात आले. 


शनिवार २२ ऑक्टोबर रोजी येथील कृषी कार्यालयात सोडत पद्धतीने गावातील २४ शेतकर्यांना हरभरा आणि ५० शेतकर्यांना ज्वारी बीयाणाचे वाटप करण्यात आले.

पंढरपूर तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे, पर्यवेक्षक देसाई, तुंगत मंडल अधिकारी नागेश पाटील यांचे सूचनेनुसार ग्रामीण भागातील शेतकर्यांना बीयाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार तुंगत गावातुन हरभरा साठी १२४ आणि ज्वारी बीयाणेसाठी ५० शेतकर्यांनी मागणी केली होती ज्वारी बीयाणे सर्व शेतकर्यांना देण्यात आले मात्र हरभरा उपलब्ध बीयाणे कमी आणि मागणी केलेले शेतकरी जास्त असलेने तुंगत गावचे उपसरपंच पंकज लामकाने, माजी सरपंच अमित साळुंखे, कृषी सहाय्यक शिवाजी चव्हाण, एस एस भोसले यांचे उपस्थितीत सोडत काढुन २४ शेतकर्यांना वाटप करण्यात आले. यावेळी विलास रणदिवे, गजेंद्र रणदिवे, पोपट आंध, बालाजी रणदिवे, उत्तम रणदिवे आणि गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement