पंढरपूर- मागील अडीच वर्षा पासून पंढरपूर शहर व उपनगरातील रस्त्यांसाठी निधी मिळाला नसल्याने जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळावी अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना केली होती. या मागणीस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जास्तीतजास्त निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
पंढरपूर शहराकडे येणारे सर्व रस्ते चांगल्या दर्जाचे करण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे पंढरपूर शहरातील व उपनगरातील रस्ते देखील मजबुत व चांगल्या दर्जाचे करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. यापूर्वी भाजपाची सत्ता असताना रस्त्यांसाठी निधी मिळाला होता. मात्र मागील अडीच वर्षात पंढरपूर शहर व उपनगरातील रस्त्यांसाठी निधी मिळाला नाही. यामुळे अनेक ठिकाणची कामे रखडली आहेत. तसेच पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. सदर रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती सन २०२२-२३ आराखड्यामध्ये पंढरपूर नगरपरिषदेने शहरातील व उपनगरातील रस्त्यांचा विविध योजनेतून निधी मिळाण्याचा प्रस्ताव दाखल केलेला होता.
त्याअनुषंगाने मा.आ.प्रशांत परिचारक यांनी मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे-पाटील तथा पालकमंत्री सोलापूर यांच्याकडे निधी मिळावा अशी मागणी केली होती. पालकमंत्री यांनी देखील तीर्थक्षेत्र पंढरीत दैनंदिन येणार्या हजारो भाविकांची संख्या पाहता लवकरच रस्त्यांच्या कामांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
.jpeg)
0 Comments