Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शेळवे येथील खंडोबा मंदिर परिसरात दिपावली पाडव्यानिमित्त दिपोत्सव साजरा !


शेळवे (संभाजी वाघुले ) शेळवे येथील खंडोबा मंदिर परिसरातदिपावली पाडव्यानिमित्त दिपोत्सव साजरा !
हा दिपोत्सव साजरा करण्यासाठी तरुणांचा मोठा सहभाग असतो. खंडोबा देवावर अपार श्रद्धा असणार्या सर्व भक्तांकडुन हा दिपावलीचा दिपोत्सव मोठ्या श्रद्धेने  साजरा करण्यात येत असतो.

शेळवे येथील खंडोबा मंदिरात देवाचा छबिना काढुन सर्व ग्रामस्थांनी एकञ येऊन हा नयनरम्य दिपोत्सव साजरा केला .

शेळवे गावातील लहान ,तरुण व अबाल वृद्धांनीही खंडोबा मंदिर परिसरात दिवा (पणती)लावुन दिपोत्सव साजरा केला.खंडोबा मंदिर परिसरात आलेल्या सर्व भाविक भक्तांनी खंडोबा देवाचे दिपावली पाडव्याला दर्शन घेऊन दिपोत्सव साजरा केला.

दिपावली पाडव्याचा दिपोत्साहाने खंडोबा मंदिर परिसर दिव्याच्या प्रकाशाने लखलखाट झाला होता.

चौकट  शेळवे गावातील चालु वर्षभरात मयत झालेल्या  30 कुटुंबांना दिपावली फराळाचे वाटप लिंबाजी (भाऊ)गाजरे यांनी स्वत: प्रत्येक कुंटुबांच्या घरी जाऊन दिपावली फराळ देऊन त्या कुटुंबाचे आशिर्वाद घेतले.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement