Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मानेगाव येथे भगीरथ योजनेतून ११के.व्ही.ए. लाईनचे उद्घाटन

 

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या प्रयत्नातून भगीरथ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ११ के.व्ही.ए. विजेच्या लाईनचे उद्घाटन आज माढा तालुक्यातील मानेगाव सबस्टेशन येथे आमदार अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी आ. अभिजीत पाटील म्हणाले सांगितले की, माढा तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. प्रत्येक डीपीवरील ऍडिशनल लाईनचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. भविष्यात कोणत्याही भागात विजेचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपयोजना करण्यात येतील. माढा तालुक्यात पूरग्रस्त भागातील मदत ही आमची जबाबदारी आहे, जाहिरात नव्हे. आम्ही मदत म्हणून जे केले ते आमचे कर्तव्य समजून केले असून, या पुढेही जनतेच्या सेवेसाठी सतत तत्पर असल्याचे आमदार अभिजीत पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाला जेष्ठ नेते विलास बप्पा देशमुख, बाळासाहेब ढवळे, रामकाका मस्के, सुरेश पाटील, प्रतापराव देशमुख, बाळासाहेब ढेकणे, सुवर्णाताई शिवपुरे, विनंतीताई कुलकर्णी, भाऊसाहेब महाडिक, निलेश बापू पाटील, दिनेश जगदाळे, ऋषिकेश तांबिले, महादेव साबळे, संजय पारडे, बप्पा शेळके, राहुल पारडे, मिटू मुकणे, बापू भोगे, विलास पारडे, आबासाहेब साठे, बाळासाहेब राऊत, संजय तांबिले, गणेश उमाटे तसेच मानेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मानेगाव व परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या नव्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामविकासाला नवीन चालना मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement