पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे दसरा सणानिमित्त दांडिया व गरबा खेळाचे आयोजन करण्यात आले
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पारंपरिक सणाचे महत्त्व समजावे यासाठी दरवर्षी विविध सण उत्सव शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे साजरे केले जातात या मधीलच विजयादशमी दसरा सणाच्या निमित्त शिवरत्न पब्लिक स्कूल मधील बाल चिमुकल्यांनी दांडिया नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला या दांडिया गरबा नृत्यासाठी विद्यार्थ्यांच्या माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होता यामध्ये माता पालक यांनी दांडिया खेळण्याचा आनंद घेतला त्याचबरोबर संस्थेच्या वतीने हळदी कुंकू समारंभ आयोजित करून महिलांना दसऱ्या सणाच्या शुभेच्छा दिल्या
यावेळी दांडिया गरबा नृत्यांमध्ये वेगवेगळे पारंपारिक नृत्य व कला विद्यार्थ्यांनी सादर केली यावेळी विद्यार्थी आकर्षक वेशभूषा परिधान करून दांडिया खेळण्याचा आनंद घेत होते सर्व माता पालक व विद्यार्थ्यांना संस्थेची संस्थापक यांनी विजयादशमी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प संचालिका वर्षा मोरे ,शितल बागल ,लीना बागल ,शीतल मस्के ,फर्जना पटेल ,तेजश्री गव्हाणे ,अविता कांबळे ,शाईन मुलाणी, सीमा रकटे, शितल राठोड, आधी शिक्षक यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार वर्षा मोरे यांनी मानले



0 Comments