कराड (वार्ताहर ) - कराड येथील मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार विश्वास मोहिते यांना नुकताच कराड येथे प्रदान करण्यात आला.
कराड येथील वेणुताई चव्हाण सामाजिक सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विश्वास मोहिते त्यांच्या मातोश्री आदर्शमाता कांताबाई मोहिते, संपतराव मोहिते हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी ज्येष्ठ विचारवंत एडवोकेट संभाजीराव मोहिते, राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानदास माळी, शेती मित्र, मळाई उद्योग समूहाचे प्रमुख अशोकराव थोरात, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय तडाके, प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे, जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, पाडळी (केसे), ग्रामपंचायतचे सदस्य आनंदा बडेकर, पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रमुख प्रकाश वायदंडे, बहुजन समता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष रामभाऊ दाभाडे, ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ बल्लाळ, एडवोकेट भारत मोहिते, जयवंत सकटे सह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन तडाखे यांनी केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 Comments