प्रदेशाध्यक्ष , कविवर्य नारायण सुमंत यांनी केली नियुक्ती.
आटपाडी - ( टिम कृषीदीप न्यूज )
शेतकरी साहित्य इर्जिक ( परिषद ) महाराष्ट्र या साहित्यीक संस्थेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आटपाडीचे जेष्ट पत्रकार सादिक खाटीक यांची नियुक्ती केल्याचे इर्जिकचे प्रदेशाध्यक्ष कवीवर्य नारायण सुमंत यांनी खास पत्राद्वारे कळविले आहे .
इर्जिकचे हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरु आहे . दि . २२, २३ मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यात, सोलापुर - पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र . ६५ वरील मोडनिंब- टेंभूर्णी दरम्यानच्या " भोईजे - आहेरगांव " फाटा येथील श्री . संत गुरु रविदास महाराज आश्रमाच्या परिसरात अंदाजे ४० लाख रूपये खर्चाचे राज्यस्तरीय शिवार साहित्य संमेलन संपन्न होत आहे . या पार्श्वभूमीवर सादिक खाटीक यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून इर्जिक परिवाराने सादिक खाटीक यांच्यासह आटपाडी आणि माणदेशाचा अप्रत्यक्षरित्या गौरव केला आहे .
१९८६ पासून साहित्यीक विश्वात कार्यरत असणाऱ्या सादिक खाटीक यांनी अनेक साहित्यिक उपक्रम राबविण्यात मोठी भूमिका बजावली आहे . शेटफळे येथील गदिमा स्मारक उभारणीसाठी सादिक खाटीक यांनी बजावलेली भूमिका प्रशंसनीय अशीच होती .
कवीवर्य नारायण सुमंत यांनी घेतलेल्या , सादिक खाटीक यांच्या नियुक्ती प्रस्तावाला माजी प्राचार्य डॉ . सयाजीराजे मोकाशी शेटफळे , कवी ज्ञानेश डोंगरे चोपडी , माजी प्राचार्य टी . के . वाघमारे नाझरे , कवी शिवाजीराव बंडगर सांगोला, सुरेश लोंढे, राजाभाऊ शिंदे माढा, संग्राम जाधव आटपाडी, अशोक माळी पंढरपूर यांच्यासह इर्जिक परिवाराने एकमुखी समर्थन दिले. सादिक खाटीक यांचे सर्व स्तरातून जोरदार अभिनंदन होत आहे .
राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ, विद्यमान मंत्री ना . जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहीते - पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार सुरेश धस, माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, साहित्यीक विठ्ठल वाघ, डॉ . सदानंद मोरे, व्यंगचित्रकार संतोष तांदळे, डॉ . नरेंद्र पाठक, पाशा पटेल, नितीन कुलकर्णी, माजी प्राचार्य डॉ . सयाजीराजे मोकाशी, शिवाजीराव बंडगर, ज्ञानेश डोंगरे, माजी प्राचार्य टी . के . वाघमारे,लता ऐवळे, अश्विनी लिके, कु . गौरी घाडगे,सौ . राजेश्वरी वैद्य - जोशी इत्यादी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिवार साहित्य संमेलन होत आहे .
समाजातील कमकुवत घटकाला आधार देऊन त्याला गावगाड्या बरोबर घेऊन जाणारी इर्जिक ही ग्रामीण महाराष्ट्राची, बहुजन समाजाची सांस्कृतीक परंपरा आहे. खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, कष्टकऱ्यांच्या शिकु - लिहू लागलेल्या मुलांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठीच शेतकरी साहित्य इर्जिक परिषद हे संस्थात्मक व्यासपीठ २५ वर्षापूर्वी उभे केले गेले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव अशी पदे सादिक खाटीक यांनी यापूर्वी भूषविली असून सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आणि ओबीसीतील अल्पसंख्याक विभागाचे पुणे विभागीय अध्यक्ष आहेत . याशिवाय मुस्लीम खाटीक बांधवांच्या देशव्यापी कुरेश कॉन्फरन्स या संस्थेचे सादिक खाटीक हे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून ही ते कार्यरत आहेत .
0 Comments