Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

महिलांना प्रसुती विषयक वैद्यकीय सेवा "सक्तीची व मोफत करावी.": सौ कल्पना कदम

 



सातारा - प्रतिनिधी

पुण्यातील मंगेशकर हाॅस्पिटल मधील घटना व गर्भवती महिलेचा झालेला दुर्देवी मृत्यू यामधून शासनाने गंभीर दखल व बोध घेऊन केंद्र व राज्य सरकारने देशातील व राज्यातील सर्व  महिलांना मानवतावादी दृष्टिकोनातून आरोग्यविषयक सेवा सुविधा मध्ये गर्भवती कालावधीत, तसेच प्रसुतीसाठी व प्रसुतीनंतर सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सेवा, औषधे , उपचार, वाहतूक सेवा सर्व प्रकारच्या खाजगी, पंचतारांकित हाॅस्पिटल व सरकारी क्षेत्रात मोफत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी गीतांजली महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष व मराठी मासिक दमयंतीच्या संपादिका सौ कल्पना कदम यांनी केली आहे.

या संदर्भात सौ कल्पना कदम पुढे म्हणाल्या की,देश आणि राज्य विकासासाठी महिलांचा सहभाग व योगदान खुप मोलाचे आहे.महिला घर, प्रपंच संभाळून शैक्षणिक, आर्थिक ,सामाजिक,कृषी ,राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, वैज्ञानिक, संशोधन , उद्योग, व्यवसाय अशा अनेक प्रकारच्या विविध क्षेत्रातील रचनात्मक विकासासाठी सतत कार्यरत असतात.देशाच्या आणि राज्यातील विकासासाच्या प्रक्रियेत सहभागी होऊन पुरुषांच्या बरोबरीने  मेहनत घेऊन देश उभारणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

महिलांना मानवतावादी दृष्टिकोनातून आरोग्यविषयक गर्भवती कालावधीत तसेच प्रसुतीसाठी व प्रसुतीनंतर सर्व प्रकारच्या खाजगी व सरकारी क्षेत्रात मोफत वैद्यकीय सेवा सक्तीची व मोफत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा.देशात आणि राज्यातील अनेक ठिकाणी  आरोग्य विषयक मूलभूत सेवा वेळेत देण्यासाठी नियोजन व कार्यवाही करावी.विशेषत: ग्रामीण,डोंगरी, दुर्गम भागातील श्रमकरी, कष्टकरी, श्रमजीवी, शेतमजूर,शेतकरी महिलांना आरोग्य विषयक वैद्यकीय सेवेची गरज व आवश्यकता अधिक आहे.अशी भावना सौ कल्पना कदम यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement