सातारा : (टिम कृषीदीप न्यूज )
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व सुहाना सफर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने "मूड्स ऑफ मुकेश" या सदाबहार रंगारंग गाण्यांचा कार्यक्रम येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता कोरपे, राजेश कोरपे,हेमंत कासार, अनिल वीर,शिरीष चिटणीस व डॉ.श्रोत्री उपस्थित होते.
प्रारंभी,दीपप्रज्वलन करण्यात आले.मुकेशच्या जयंतीदिनी मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रमाची संकल्पना व नियोजन क्लबचे प्रमुख विजय साबळे यांचे होते.त्यांनीच गण्यास प्रारंभ केला. विजय साबळे यांच्यासह डॉ.लियाकत शेख, वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, ममता नरहरी आदी गायक कलाकार यांनी सहभाग घेतला.सदरचा कार्यक्रम सातारकर रसिक श्रोत्यांसाठी विनामूल्य आयोजित केला असल्याने हाऊसफुल हॉल होता. "मूड्स ऑफ मुकेश" या गाण्यांच्या रंगारंग कार्यक्रमासाठी समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी रात्री उशिरापर्यंत लाभ घेतला.

0 Comments