Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

डॉ.श्रद्धा कदम यांनी तीन हजार वारकरी रुग्णावर केले मोफत उपचार

 

पंढरपूर( टिम कृषीदीप न्यूज )

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे देशभरातून लाखो भाविक वारकरी येत असतात, या वारकऱ्यामधील काही रुग्ण वारकऱ्यांवर श्री.विश्वधारा आयुर्वेदिक क्लिनिक च्या माध्यमातून डॉ.श्रद्धा विक्रम कदम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने दोन दिवसांमध्ये तीन हजार वारकरी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

आषाढी वारीच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागातून लाखो भाविक चालत पंढरपूरला येत असतात,या वारकऱ्यांना ऊन-वारा-पाऊस आणि इतर नैसर्गिक गोष्टींना तोंड देत पंढरीला यावे लागते,अशा या चालत येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये,तसेच आषाढी वारी मध्ये छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक या वारीमध्ये सहभागी झालेले असतात, त्यांना देखील अंगदुखी,पाय दुखी, डोके दुखी,पित्ताचा त्रास आणि जुलाब सारखे अनेक छोटे मोठे आजार झालेले असतात.अशा या वारकऱ्यांवरती मोफत उपचार करण्यात आले असल्याची माहिती डॉ.श्रीधर येलमार व रेखा चंद्रराव यांनी दिली.

आषाढी वारीमध्ये श्री.विश्वधारा क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी पाच दिवस मोफत शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते.यावर्षी मात्र दोनच दिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य शिबिरामध्ये चालत आलेल्या वारकऱ्यांचे ड्रेसिंग करण्याचे काम डॉ.कैलास नरळे तसेच सिमरत खाटीक या दोघांनी केले.

आरोग्य शिबिरासाठी डॉ.श्रद्धा कदम, डॉ.श्रीधर यलमार,डॉ.कैलास नरळे, डॉ.स्नेहलता घाडगे,रेखा चंद्रराव, दिपाली सतपाल,सिमरत खाटीक, सतीश चंद्रराव,संकेत चंद्रराव,सानिया भोसले,अनुजा पवार,पियुशा दळवी, प्रद्युम्न भोसले,सर्वेश जवंजाळ, राजसिंग मोरे,या सर्वांनी अविरत प्रयत्न केले.

शिबिरास पंढरपुर येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ.अरुण मेनकुदळे, नेत्ररोग तज्ञ मनोज भायगुडे,प्राचार्य सिताराम मोरे,पोलीस निरीक्षक अरुण पवार,अलका पवार,तेजश्री भायगुडे,खोपोलीचे नगरसेवक राजू गायकवाड,ऋषिकेश भालेराव यांनी सदिच्छा भेट दिली.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement