सातारच्या विश्वास मोहिते यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदाची नगरचे दीपक मोहिते आणि रत्नागिरीचे असलम शेख यांचेवर जबाबदारी
कराड - महाराष्ट्र राज्य बरोबर इतर काही राज्यात सक्रिय असलेल्या भारतीय ग्रामीण वार्ताहर परिषद या पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आल्या.
संघटनेचे तिसरे अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडली. अधिवेशन दरम्यान नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार तिरंगा रक्षक चे संपादक विश्वास मोहिते यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी लोकस्तंभ चे संपादक दीपक मोहिते आणि रत्नागिरी येथील जयश्री पत्रकार असलम शेख यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सरचिटणीस पदी ऍडव्हान्स खबर चे संपादक एडवोकेट अंश खलीपे यांची निवड करण्यात आली. ही बैठक ज्येष्ठ पत्रकार आणि लोकस्तंभ चे संपादक दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
नुकत्याच झालेल्या बैठकीत सदस्य म्हणून पुढील निवडी करण्यात आल्या. पोपटराव भिसे सातारा, दिलीप महाजन सातारा, दिनेश झाडे चंद्रपूर, बाबासाहेब कांबळे शिराळा, श्रीधर सोनुले चंद्रपूर, अण्णा वाघमारे पंढरपूर, प्रशांत माळवदे पंढरपूर, शिवसने जळगाव, अमित वालदे गोंदिया, परशुराम भगळे अक्कलकोट सोलापूर , प्रमोद जाधव बुलढाणा, मनीष खर्चे अकोला, मनोहर कांबळे हिंगोली, संपतराव मोहिते सातारा, किरण औटी छत्रपती संभाजीनगर आदींच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी मावळते उपाध्यक्ष यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला.
निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना विश्वास मोहिते म्हणाले, संघटनांमध्ये पदाधिकाऱ्यांनी- सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र होऊन काम करेन. पत्रकारांना सुविधा देताना असणाऱ्या जाचक अटी याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पत्रकारांच्या समस्या मांडणार आहे त्याचबरोबर पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सदैव सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने नव्याने लढा उभारणार आहे. स्वागत आणि प्रास्ताविक संपतराव मोहिते यांनी केले. आभार अमित वालदे यांनी मानले.
0 Comments