Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जेष्ठ पत्रकार कै.शशिकांत महाजन आदर्श पत्रकार गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 .

कराड - (कृषीदीप न्यूज )

 पाडळी (केसे )तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा जेष्ठ पत्रकार कै.शशिकांत महाजन आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार  सन्मान करण्यात येणार असून इच्छुक पत्रकारांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेचे  मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार  कैलासवासी शशिकांत शंकरराव महाजन  पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष संपतराव मोहिते यांनी केले आहे.


 सांगली जिल्ह्यातील मूळ तडसर वांगी गावचे सुपुत्र कै.शशिकांत शंकर महाजन यांनी पत्रकार क्षेत्रात कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले होते. आजही काही पत्रकार त्यांच्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करीत आहे. ज्येष्ठ पत्रकार शशिकांत महाजन यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन  4 मे 2024 रोजी झाला. त्यांच्या कार्याचे नाव सदैव पत्रकारिता क्षेत्रात आजरावर व्हावं या प्रामाणिक उद्देशाने  त्यादिवशी आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  विश्वास मोहिते यांनी पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी शशिकांत शंकरराव महाजन यांच्या नावाने पत्रकारिता क्षेत्रातील  उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींना  हा पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याचे जाहीर केले.

 या अनुषंगाने  पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा प्रतिवर्षी यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. चालू वर्षापासून हे पुरस्कार देणारा असून इच्छुकांनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आणि  कैलासवासी शशिकांत शंकरराव महाजन आदर्श पत्रकार निवड समितीचे अध्यक्ष संपतराव मोहिते यांनी केले आहे. हे प्रस्ताव मार्गदर्शक संपतराव मोहिते आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी केसे तालुका कराड जिल्हा सातारा मोबाईल नंबर 97 63 20 10 56 या पत्त्यावर ती पाठवावे असेही पत्रकात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement