पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज
महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय खो - खो स्पर्धा शासकीय मैदान नेहरूनगर येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामन्यात वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोलीच्या संघाने माळशिरस तालुका संघाचा 3 मिनिटे राखून पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला. या संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून या संघाची पुणे विभागीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
अंतिम सामन्यात वाडीकुरोलीच्या खेळाडू साक्षी देठे, समृद्धी सुरवसे, ऋतुजा यलमार, साक्षी साळुंखे, पल्लवी बोराडे यांनी उत्कृष्ठ संरक्षण केले तर वैष्णवी काळे श्रुती कस्तुरे ऋतुजा पासले समृद्धी काळे अमृता सुरवसे सानिका चव्हाण आयेशा शेख यांच्या धारदार आक्रमणामुळे सहज विजय मिळवला. सर्व खेळाडू व प्रशिक्षक अतुल जाधव यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे सचिव बाळासाहेब काळे राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्यन जाधव प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments