.
पंढरपूर. -- टिम कृषीदीप न्यूज
पंढरपूरचा पांडुरंग तथा श्री विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात या अनुषंगाने प्रमाण देताना म्हटले आहे, पुंडलिकाच्या भावार्थ, गोकुळीहूनी आला येता...नीज प्रेम भक्ती भक्त आता घ्या घ्या असे...
त्यामुळेच तीर्थक्षेत्र वृदावन प्रमाणे पंढरपूर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हरे कृष्ण धाम येथे श्री कृष्ण जन्म उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला केला जातो...
आज गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या तीरावरील हरे कृष्ण धाम येथे श्री कृष्ण जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा वैशिष्ठ्यपूर्ण नृत्याविष्कार म्हणजे रास लीला...
पंढरपूर मधील प्रतिभा मेकअप ग्रुपच्या तरुणींनी चंद्रभागा नदीच्या तीरावरील हरे कृष्ण घाटावर ...राधा कृष्ण आणि गोपिका यांच्या रासलीलेचा मनमोहक असा नृत्याविष्कार सादर करण्यात आला ...
साक्षात श्री कृष्ण आणि राधाचं चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरून रासलीला करीत आहेत असा भास उपस्थितांना होत होता...हा सुंदर अन् मनमोहक कलाविष्कार पाहून दर्शनासाठी आलेले भाविक देहभान विसरुन या नृत्यात दंग होताना दिसत होते...
प्रतिभा मेकअपच्या संचालिका प्रतिभा यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी या
रासलीलेचे आयोजन केले होते. दरम्यान श्री विठ्ठल मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली असून गोकुळ अष्टमीची जोरदार तयारी सर्वत्र सुरु सुरु आहे...




0 Comments