पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज
पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पुर्ण दिवसाचा कार्यक्रम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीच आखलेला होता, इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत या दिवसाचे औचित्य साधले.
नियमित प्रार्थना झाल्यानंतर वेळापत्रकानुसार वर्ग भरण्यात आले.
मुख्याध्यापकांचा कार्यभार देखील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यानेच स्वीकारला, इतर शिक्षकांच्या भूमिकेत सुद्धा विद्यार्थीच होते. काही विद्यार्थी शिक्षकेतर सेवकांच्या भूमिकेत होते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेचे संपूर्ण कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे पाठ घेतले.
शाळा सुटण्यापूर्वी शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व शिक्षक दिनाविषयी मनोगते व्यक्त केली. प्रशालेतील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक डॉ.श्री एस. एस. ढवळे सर यांनी मार्गदर्शन करताना गुरु शिष्य परंपरा जपण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आर्या बहिरवाडे यांनी आभार कु. हर्षिता बनसोडे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एस. डी. चंद्रराव सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. वैभव साळुंखे,सचिवा सौ.आटकळे मॅडम प्रशालेचे पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी-उपस्थित होते.

0 Comments