पंढरपूर- टिम कृषीदीप न्यूज
पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांनी अत्यंत हर्षोल्हासात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव साजरा केला. लहान बाळगोपाळ श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सजून आली होती. शाळेतील प्रत्येक वर्गातील मुलांची तसेच मुलींचीही दहीहंडी घेण्यात आली. गोविंदा आला रे आलाच्या गाण्यावर उत्साहात एकमेकांच्या खांद्यावर थर रचून दहीहंडी फोडण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण व आनंददायी उपक्रम घेण्यात आला. पारंपारिक सण, उत्सव, महामानवांच्या जयंती, राष्ट्रीय सण असे उपक्रम साजरे करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जातो. याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुला-मुलींनी अत्यंत आनंदाच्या वातावरणात दहीहंडी सण उत्सव साजरा केला याप्रसंगी विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सतीश चंद्रराव तसेच पंकज गुरमे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वैभव साळुंखे, सचिवा सौ. स्मिता आटकळे, मुख्याध्यापक सिकंदर ढवळे, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांचे सहकार्य लाभले.

0 Comments