Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आ समाधान आवताडे यांनी पंढरपूर तहसिल कार्यालया समोर मराठा आरक्षण आमरण उपोषण स्थळी दिली भेट

 

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

मराठा आरक्षणासाठी पंचायत समिती पंढरपूर येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करुन आपल्या हक्काची लढाई लढणाऱ्या आंदोलनकर्त्या युवकांना व समाजबांधवाना पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ .समाधान दादा आवताडे  यांनी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन मराठा आरक्षणाची ही धगधगती ज्वाला शासन दरबारी पोहोचवून यशस्वी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

"एक मराठा लाख मराठा" हे वाक्य सार्थ ठरवत त्यांच्या समाजशील कार्याला आज प्रत्येक स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. लाखो मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या या लढवय्याला पंढरपूर- मंगळवेढातील समस्त मराठा बांधव आपल्या पाठिशी असल्याचेही आमदार महोदय यांनी सांगितले.

सदर प्रसंगी उपस्थित DYSP श्री.अर्जुन भोसले सो, तहसीलदार श्री सुशील बेल्हेकर सो,PI श्री.मिलिंद पाटील सो,PI श्री.अरुण फुगे सो तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement