Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मैसूर - पंढरपूर गोल घुमट एक्स्प्रेस चार सप्टेंबर पासून सुरू होणार

 

मैसूर येथून दररोज दुपारी सुटणार : दुसऱ्या दिवशी दुपारी पंढरपूर मध्ये पोहोचणार 

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

मैसूर ते सोलापूर ही गोल घुमट एक्सप्रेस रेल्वे गाडी आता पंढरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. येत्या ४ सप्टेंबर पासून ही रेल्वे सुरू होत असून दररोज पंढरपूर ते म्हैसूर अशी रेल्वे धावणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील प्रवाशांना पंढरपूरला येण्यासाठी आणि पंढरपूरच्या प्रवाशांना दक्षिण भारतात जाण्यासाठी एक चांगली रेल्वे गाडी उपलब्ध झाली आहे. 

यासंदर्भात २५ ऑगस्ट रोजी रेल्वेच्या दक्षिण - पश्चिम विभागाच्या वतीने या विस्तारित रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मैसूर ते गदग पर्यंत रेल्वेचे वेळापत्रक नियमित असणार आहे, परंतु गदग ते पंढरपूर या दरम्यान रेल्वेच्या धावण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे.  सद्या ही रेल्वे मैसूर ते सोलापूर अशी सुरू आहे, मात्र पंधरा दिवसांपूर्वी या रेल्वे गाडीचा प्रवास पंढरपूर पर्यंत  वाढवण्यात आलेला आहे.परंतु अद्याप या गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले नव्हते. शुक्रवारी रेल्वेने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार म्हैसूर ( गाडी नंबर १६५३५ ) येथून पंढरपूर साठी दररोज दुपारी ३,४५ वाजता ही रेल्वे निघणार, असून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी  १०.४५ वाजता  पोहोचणार आहे. त्यानंतर लगेचच दुपारी एक वाजता ही रेल्वे मैसूर (गाडी नंबर १६५३६ )  साठी परत निघणार असून दुसऱ्या दिवशी  म्हैसूर येथे ही रेल्वे दुपारी दुसऱ्या दिवशी २ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. 

अशी माहिती दक्षिण - पश्चिम रेल्वेच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान १ ऑक्टोबर पासून या वेळापत्रकात बदल केला जाण्याचीही शक्यता रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

या विस्तारित रेल्वेचा लाभ दक्षिणेतून  पंढरपूर ला येणाऱ्या आणि पंढरपूर हून दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement