पंढरपूर : टिम कृषीदीप न्यूज
तिसंगी (ता. पंढरपूर) येथील आण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसंगी या विद्यालयातील विद्यार्थिनीने तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धात 43 किलो वजन गटात कुस्ती (फ्रीस्टाईल) स्पर्धेत 17 वर्षीय मुलीमध्ये कु. श्रद्धा विजयकुमार मेलगे हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
तसेच या विद्यार्थ्यांना (खेळाडूंना) जुनिअर विभागाचे क्रीडाशिक्षक श्री. बी. एम. गलांडे सर, माध्यमिक विभागाचे श्री. बी. बी. लोखंडे सर, श्री. बी एच लेंगरे सर, वैभव गायकवाड, लेखनिक हर्षद डोईफोडे, दादा माने यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक, शिक्षक यांचे संस्थेचे चेअरमन श्री. आर. एस. चोपडे सर, व्हा. चेअरमन श्रीमती एल टी शेंडगे मॅडम, सचिव श्री. एस ए. पाटील सर, संचालक डी. के. हेगडे सर, प्राचार्य श्री. वामन शेळके सर, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक श्री. प्रमोद खरात सर, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री. आबासो सलगर सर व सर्व ग्रामस्थ, पालक, वस्ताद, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.

0 Comments