। पंढरपूर - ( टिम कृषीदीप न्यूज )
गादेगांव (ता.पंढरपूर) येथील गादेगांव विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक, प्रगतशिल बागायतदार पांडुरंग उर्फ पंढरीनाथ प्रल्हाद बागल (वय 88) यांचे उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले.
उपजिल्हाधिकारी सतिश बागल, बाबुराव बागल यांचे ते वडिल होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण गादेगांव पंचक्रोषीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, पाच मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसरा शुक्रवार दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वा. गादेगांव येथे होणार आहे.

0 Comments