मंगळवेढा - ( टिम कृषीदीप न्यूज )
मंगळवेढा तालुक्यामध्ये महावितरण विभागा विषयी अनेक लोकांच्या तक्रारी येत असून शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शनच्या तारा लूज झाल्या आहेत, अनेक ट्रांसफार्मर मधील पेट्यांमध्ये फ्युजा नाहीत, ट्रान्सफर्मार च्या केबल बदलणे, वाकलेले पोल सरळ करणे ही सर्व कामे -एक गाव एक दिवस, अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत,
त्याचा भुर्दंड शेतकऱ्यावर बसवू नये, अनेक ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत 127 ट्रांसफार्मर मी नवीन मंजूर करून दिले आहेत. त्याचीही कामे वेळेत पूर्ण करा यापुढे महावितरण विभागाची कोणतीही तक्रार येता कामा नये अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी गाव भेटीदरम्यान महावितरणच्या अधिकारी महेश पारवे व त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शनिवारी दिवसभर येड्राव, खवे, जित्ती, बावची, जंगलगी, सलगर खु, सलगर बु, लवंगी, आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी या गावांचा दौरा पूर्ण केला. यावेळी त्यांचे सोबत प्रांत अधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार मदन जाधव, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे, मंगळवेढा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वाघमोडे, वनविभागाच्या चैत्राली वाघ, पशुसंवर्धनचे सुहास सरगर, प्राथमिक आरोग्य विभागाचे नंदकुमार शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजकुमार पांडव, शिक्षण अधिकारी पोपट लवटे, नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, यांचे सह विविध खात्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीमध्ये विविध गावात दिलेल्या निधीचे वितरण व्यवस्थित झाले आहे का? कामे व्यवस्थित सुरू आहेत का? याचा आढावा आ अवताडे यांनी घेतला.
यामध्ये जलजीवन योजनेत ठराविक वस्त्या घेतल्या आहेत बाकीच्या वस्त्यांचा समावेश झाल्याशिवाय काम सुरू करू नका, ग्रामसेवक निष्क्रिय, रस्ता मागणी, पिण्याचे पाणी या प्राथमिक अडचणी अनेक गावांतील लोकांनी मांडल्याने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही वीज व पाण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची शोकांतिका व्यक्त करत येत्या काही दिवसात या सर्व समस्या मार्गी लागतील असे आश्वासन आ आवताडे यांनी नागरिकांना दिले.
----------------------------------------------------------------------**
ओव्हरलोड असलेले व वारंवार जळणाऱ्या ट्रान्सफॉर्मर ला पर्यायी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून वाढीव निधी आणून आवश्यक ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची सोय लवकरच करण्यात येईल असेही आमदार अवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले
----------------------------------------------------------------------***


0 Comments