निमगाव-- (टिम कृषीदीप न्यूज )
ओंकार साखर कारखाना प्रा लि चांदापुरी युनिट क्रमांक एक च्या 2023 व 202४ या सिझन च्या मिल रोलरचे पुजन कारखान्याचे जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे व निकम यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकरी रामभाऊ मगर म्हणाले की कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
ओंकार साखर कारखान्याने सलग तीन वर्ष कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसासाचे गाळप करून समाधानकारक दर दिला आहे असुन विस्तारीतकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत या सिझनला कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ होणार असुन इथेनॉल वीज प्रकल्प कंपोस्ट खत पेट्रोल पंप हे विस्तारीकरण प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वात जास्त दर देता येईल भागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होणार असुन या भागाचा कायापालट होणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना
भागासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांचे ऊस उत्पादक कमगार यांच्या वतीने आभार मानले या वेळी चीफ इंजिनिअर तानाजीराव देवकते फायन्स मॅनेजर किरण चव्हाण ऊस पुरवठा आधिकारी विष्णु गोरे स्टोअर किपर धन्यकुमार जमदाङे एच् आर गणेश धायगुङे सुरक्षाआधिकारी मोहन घोङके सर्व विभाग प्रमुख कामगार ऊस उत्पादक उपस्थित होते

0 Comments