पंढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )
धन्य ते अरण!
रत्नाची खाण!!
जन्मला तो निधान!
सावता सागर!
प्रेमाचे आगर!!
या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे.कामातच देव मानणाऱ्या कांदा, मुळा, भाजी आवघी विठाई माझी अशी ओळख असणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी कानड्या विठुरायाच्या पालखीचे प्रस्तान आज गुरूवार (दि.१३ जुलै)रोजी झाले.
आषाढी एकादशीच्या अगोदर संताच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होतात. परंतु अपवाद फक्त संत शिरोमणी सावता माळीयांची पालखी येत नाही तर आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाची पालखी अरण येथे संत सावता माळी यांच्या हे विशेष म्हणावे लागेल. आज सकाळी काशी कापडी समाजाच्या मठातून हजारो भाविक भक्तांच्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवून प्रस्थान करण्यात आले.
विठ्ठल मंदिरातुन मानकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेऊन, विधिवत पूजा करण्यात आली. या पादुकांमध्ये विठलाचा वास येतो असे सांगितले जाते. यानंतर पादुका पालखीत ठेवून अरण कडे प्रस्थान झाले. तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचून संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते. जगाचा देव असणारा पांडुरंग भक्ताच्या म्हणजे संत सावता माळी यांच्या भेटीस जातो यामुळे या सोहळ्यास अत्यंत महत्त्व आहे.
यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्यासह काशी कापडी समाजाचे मानकरी नागेश गंगेकर, अरण ट्रस्टचे सचिव ऍड. विजय शिंदे, सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू, प्रदेश संघटक सौ.साधना राऊत, , माढा तालुकाध्यक्ष डॉ.भारत कुबेर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सयाजी बनसोडे, काँग्रेसचे संग्राम जाधव,पत्रकार सावता जाधव सोहळा प्रमुख मोहन कुलकर्णी, पुजारी विजय देशमुख गोपीनाथ कुलकर्णी, काशी कपडे समाजाचे अध्यक्ष श्री गंगेकर व त्यांचा समाज, रथाचे चालक पंडित सुर्वे, रघुनाथ जाडकर, बाबा सोलंकर श्रीधर सोलंकर विशाल पिंगळे विवेक गंगीकर सोमनाथ टमटम राहुल गंगेकर आदीसह भाविकभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 Comments