Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कै.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज गुणवंतांचा सत्कार सोहळा

 


पढरपूर- ( टिम कृषीदीप न्यूज )

 इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन करणाऱ्या येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कै महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज रविवार, दिनांक १६जुलै २०२३ रोजी दुपारी २.००वाजता रखुमाई सभागृह शहर पोलीस स्टेसन समोर पंढरपूर  येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाप्रसंगी गुणवंतांचा सत्कार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कु. रोहिणी बाणकर, तहसीलदार सुशील कुमार बेलेकर, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक अरुण फुगे आदी मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्व गुणवंत, मार्गदर्शक शिक्षक, पालक  इतर नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement